मोठी बातमी : पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेला धक्का : जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांचा भाजपामध्ये प्रवेश!
![Big news: Push to Shiv Sena in Pimpri-Chinchwad: District Chief Gajanan Chinchwade joins BJP!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/Gajanan-chinchawde-pcmc.jpg)
- माजी शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप यांची उपस्थिती
- शिवसेनेचे पाच नगरसेवक भाजपाच्या संपर्कात
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शिवसेनेत खळबड उडवून देणारी घटना समोर आली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, कामगार नेते अमोल कलाटे यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
मुंबई येथे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चिंचवडे यांनी कमळ हाती घेतले. यावेळी माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, संघटन सरचिटणीस अमोल थोरात आदी उपस्थित होते.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…
पिंपरी-चिंचवडचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, कामगार नेते अमोल कलाटे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला. आ. लक्ष्मण जगताप उपस्थित होते.@Dev_Fadnavis pic.twitter.com/buE1wY4clJ
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 22, 2021