Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवड
मोठी बातमी: कासारवाडीतील महापालिकेच्या जलतरण तलावात गॅस लिकेज
नागरिकांना श्वास घेण्यास अडथळा : २२ जण रुग्णालयात दाखल
![Big news: Gas leakage in municipal swimming pool in Kasarwadi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Gas-leakage-in-municipal-swimming-pool-in-Kasarwadi-780x470.jpg)
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कासारवाडीतील जलतरण तलावात आज मंगळवारी (दि. 10) क्लोरीन गॅस लिकेज झाला आहे. त्यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. जीवरक्षक, सुरक्षा रक्षक अशा 22 जणांना त्रास झाला असून उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कासारवाडीत महापालिकेचा जलतरण तलावातील पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन गॅसचा वापर केला जात होता. गॅसची टाकी आणि पाण्याचा संपर्क आला. त्यामुळे तलावात गॅस गळती सुरू झाली. सकाळी पोहोण्यासाठी आलेल्या काही जणांना त्रास होऊ लागला. त्यामुळे पोहोण्यासाठी आलेले नागरिक, जीवरक्षक, सुरक्षा रक्षक यांना उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस दाखल झाले आहे.