‘‘हायवे ऑफ डेव्हलपमेंट’’ पुस्तकाचे भोसरीत प्रकाशन
![Bhosari publication of the book "Highway of Development"](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/478a64e8-1228-425f-82fd-d46b026c00aa.jpg)
- भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची उपस्थिती
पिंपरी । प्रतिनिधी
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यकर्तृत्वाबाबत लेखक अशोकराव टाव्हरे लिखित “हायवे ऑफ डेव्हलपमेंट ” या पुस्तकाचे प्रकाशन भोसरी येथे झाले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रांत सह संपर्क प्रमुख मिलिंद देशपांडे, विश्व हिंदू परिषद प. महाराष्ट्र प्रांत सह मंत्री सतिश गोरडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विलास लांडगे, भाजपा पिंपरी चिंचवड जिल्हा संघटन सरचिटणीस, प्रवक्ते अमोल थोरात व लेखक अशोक टाव्हरे आदी उपस्थित होते.
लेखक अशोकराव टाव्हरे हे कनेरसर ता. खेड येथील रहिवासी आहे.त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यावर आधारित” विकासाचा राजमार्ग “या पुस्तकाच्या दोन आवृत्त्या प्रकाशित केल्या आहेत. गडकरी यांनी इंग्रजी पुस्तकासाठी लेखी परवानगी दिली होती.
१९७६ पासूनचे अभाविप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजयुमो ,भाजपचे प्रदेशाध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्ष, विधानपरिषद सदस्य ते विरोधी पक्षनेते,महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ते केंद्रातील सर्वात कार्यक्षम मंत्री हा प्रवास लेखक अशोकराव टाव्हरे यांनी पुस्तकातून उलगडला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून नितीन गडकरी यांचे कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत जाण्यास मदत होईल, असे मत आमदार लांडगे यांनी व्यक्त केले.