भोसरी पोलीसांकडून २५० बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध सुरु…
![Bhosari police starts search for owners of 250 unattended vehicles ...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/cars-image-1.jpg)
- १५ दिवसांत वाहनं घेऊन न गेल्यास होणार लिलाव…
पिंपरी |
विविध गुन्ह्यांत जप्त केलेली मात्र अनेक वर्षापासून पडून असलेल्या २५० बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेण्यात आला आहे. भोसरी पोलीस ठाणे व गंगामाता वाहन शोध संस्था यांच्यातर्फे हा उपक्रम राबवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, निरीक्षक ( गुन्हे ) जितेंद्र कदम, गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे, भरत वाघ, शिवाजी जव्हेरी यांनी वाहनमालकांचा शोध घेतला आहे.
शंकर आवताडे म्हणाले, विविध गुन्ह्यात शेकडो वाहने जप्त केली जातात. न्यायालयीन प्रक्रिया तसेच मूळ मालकांचा नाव व पत्ता माहीत नसल्याने शेकडो वाहने पडून असतात. भोसरी पोलीस ठाण्याकडील अशा एक हजाराहून जास्त असलेल्या वाहनांपैकी २५० वाहनांच्या मालकांचा शोध घेतला आहे. त्यांना त्यांची वाहने परत दिली जाणार आहेत. गंगामाता वाहन शोध संस्थेच्या मदतीने वाहन मालकांना संपर्क साधण्यात येणार आहे. संबंधित वाहन मालकांनी भोसरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून वाहन घेऊन जावे. १५ दिवसांत वाहन घेऊन न गेल्यास ती वाहने बेवारस समजून त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे.
वाचा- गुन्हे दाखल करण्यासाठी जयंत पाटील पोलिसांवर दबाव टाकत आहेत- प्रशांत बंब