भोसरी आळंदी रोड येथील दिघी मॅगझीन सेवा केंद्रामध्ये भव्य महारोजगार मेळावा उत्साहात
श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित स्वयंरोजगार विभाग अंतर्गत सतिशदादा मोटे यांचे नियोजन
भोसरीः श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित स्वयंरोजगार विभाग अंतर्गत परमपूज्य गुरुमाऊलीच्या आर्शिवादाने व सतिशदादा मोटे यांच्या नियोजनाने भव्य महारोजगार मेळावा 4 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10:00 ते 05:00 या कालावधीत दिघी मॅगझीन सेवा केंद्र, गणेश नगर कमान, भोसरी आळंदी रोड, पुणे येथे उत्साहात पार पडला. सदर मेळाव्याचे उदघाटन उद्योजक कार्तिक लांडगे, पिपंरी चिचंवड मनपाचे माजी शिक्षण मंडळ सभापती चेतन घुले, उद्योजक सुहास ताम्हाणे, मुंबई महापौर केसरी श्री.अजय लांडगे, पिपंरी चिचंवड मनपाचे कामगार कल्याण विभागाचे उपायुक्त संदीप खोत व पुणे जिल्हा प्रतिनिधी अशोक जाधव, संन्यासी काका यांच्या हस्ते करण्यात आले.
दिंडोरी प्रणित स्वयंरोजगार विभाग अंतर्गत होणाऱ्या भव्य महारोजगार मेळाव्यात 2000 रिक्त पदांसाठी नोंदणी करण्यात आली. यातून दुसऱ्या फेरीसाठी ६६२ तर शेवटच्या फेरीसाठी ८४२ तर शेवटच्या फेरीसाठी ३०८ पदांवर २१९ उमेदवारांची निवड करण्यात आली. विवाह संस्कार विभागाअंतर्गत २५० विवाह इच्छुकांची नोंदणी करण्यात आली. सदरच्या मेळव्यानंतर कृषीरत्न आबासाहेब मोरे यांनी स्वयंरोजगार विभागातून रोजगाराची निर्मिती, महिला बचतगटाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविणे, लहान मुलांवर योग्य वयात बालसंस्कार काळाची गरज, देशी गायीचे संगोपन व त्यापासुन होणारे फायदे, विवाह संस्कार काळाची गरज ,पर्यावरण प्रकृती या विभाच्या माध्यमातुन प्लेट बँकचे महत्व, केद्रं म्हणजे केवळ आरती करणे नव्हे , दिंडोरी मार्गाच्या १८ विभागातुन ८०% टक्के समाजकार्य करण्यात येते या याबाबत असे बहुमोल मार्गदर्शन सेवकरी वर्गाला करण्यात आले.
सदर मेळाव्यासाठी भोसरी विधानसभा मतदार संघ मा. आमदार महेशदादा लांडगे यांचे बंधू कार्तिक लांडगे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आम्ही सदैव सहकार्य करण्यास तत्पर आहोत. पुढील काळात दिंडोरी प्रणित स्वामी कार्यासाठी जी मदत लागेल. ती आम्ही करू. सदर मेळाव्यासाठी दिघी केद्रांतील मनोज काळे, शिवाजी पवार, साखरे साहेब, आनंद फुले, अमोल शिंदे, विजय भोसले, गोरख साबळे, रोहीत तापकीर, शाम, अगंद घोरबंड तसेच उज्जवला सांडभोर ताई, दीपताई काळे, अपूर्वाताई साखरे, माधुरीताई पवार, सविता पाटीलताई, गीता ताई, वाघसकर ताई, देशमुख ताई, भुजबळ ताई, निताताई केंद्रे, गौरीताई वागुंडे, निकम ताई, ढगे ताई, भोसले ताई या महिला बचत गट प्रतिनिधी..इत्यादी सेवेकरी वर्गाचे सहाकार्य लाभले.