भरधाव ट्रकची दुचाकीला धडक : दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/accident-helpline.png)
पिंपरी l प्रतिनिधी
ट्रकने एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील ज्येष्ठ व्यक्ती गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात 17 फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता खेड तालुक्यातील सोळू गावात घडला.
महादेव भगवान गावडे (वय 61) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी काळुराम महादेव गावडे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक (एम एच 14 / बी एम 9710) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता महादेव गावडे हे त्यांच्या दुचाकीवरून जात होते. सोळू गावच्या हद्दीत आरोपी चालकाने ट्रकचा क्लिनर साईडने दुचाकीला धक्का दिला. यामध्ये महादेव गावडे हे दुचाकीवरून रस्त्यावर पडले. त्यांना तात्काळ उपचारासाठी मोशी येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र 26 फेब्रुवारी रोजी पहाटे सव्वाचार वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.