पिंपरी / चिंचवड

दारूच्या नशेत आईला मारहाण

पिंपरी l प्रतिनिधी

ताथवडे येथे एक मुलाने दारूच्या नशेत घरी येऊन आईला मारहाण केली. आई घराचा दरवाजा बंद करत असताना तिचा हात दरवाजात अडकला. त्यानंतर मुलाने जबरदस्तीने दरवाजा बंद केला. यामुळे आईची दोन बोटे तुटली. ही घटना सोमवारी (दि. 30) मध्यरात्री साडेबारा वाजता श्रीराम आरंभ सोसायटी ताथवडे येथे घडली.

शकुंतला शिवाजी धोंडे (वय 46, रा. ताथवडे) असे जखमी आईचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुलगा तुषार शिवाजी धोंडे (वय 30, रा. ताथवडे) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घरी असताना आरोपी मुलगा दारू पिऊन घरी आला. घरगुती भांडणाच्या कारणावरून तुषार याने आई शकुंतला यांना मारहाण करून शिवीगाळ केली. शकुंतला एका हाताने बेल वाजवून दुसऱ्या हाताने दरवाजा बंद करत होत्या. त्यावेळी त्यांचा हात दरवाजात अडकला. त्यानंतर तुषार याने जाणीवपूर्वक दरवाजा बंद केला. त्यामुळे शकुंतला यांच्या हाताची करंगळी आणि त्याशेजारील बोट तुटून गंभीर दुखापत झाली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button