‘फोन का उचलत नाही’ असे म्हणत महिलेला मारहाण
![Beating a woman saying ‘why don’t you pick up the phone’](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/marhan.jpg)
पिंपरी |
‘तू फोन का उचलला नाही’, असे म्हणून महिलेला शिवीगाळ व हाताने मारहाण केली. ही घटना वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे बुधवारी (दि. 25) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. ज्योती विवेकानंद नांगराळे (वय 30, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी गुरुवारी (दि. 26) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार राजू सुरेश थोटे (वय 30, रा. वाल्हेकरवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. बुधवारी रात्री साडेआठ वाजता आरोपी फिर्यादी यांच्या घरासमोर आला. ‘तू फोन का उचलला नाही’ असे म्हणत शिवीगाळ व हाताने मारहाण करून तुझ्याकडे पाहतो अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना गंभीर जखमी केले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.