विनाकारण तरुणाला घरात घुसून मारहाण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/images-10.jpeg)
आपल्या खोलीत बसलेल्या तरुणाकडे जाऊन ‘तुझा मर्डर करून जेलमध्ये जाईल’ अशी धमकी देत मारहाण केली. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 28) पहाटे तीन वाजता ताथवडे येथे घडली.
सौरभ सोमनाथ भोसले (वय 19, रा. ताथवडे. मूळ रा. महाळुंग, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजिंक्य परमेश्वर नांदरे, स्वराज कुडके आणि त्यांचे तीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या खोलीत असताना आरोपी खोलीत आले. आरोपी अजिंक्य आणि स्वराज यांची फिर्यादीसोबत तोंडओळख आहे. आरोपींनी काहीही कारण नसताना फिर्यादींना हाताने मारहाण करून शिवीगाळ गेली. ‘तुझा मर्डर करून जेलमध्ये जाईल’ असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.