बीएआय शिर्के अवॉर्ड्सने सिल्वर गार्डीनिया गृहप्रकल्पाचा सन्मान!
जिल्ह्यातून नामांकन; कामाचा दर्जा, कर्मचारी सुरक्षेला प्राधान्य
पिंपरी-चिंचवड : बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून ‘बीएआय शिर्के अवॉर्ड्स बिल्ड स्ट्रक्चर कॉम्पिटिशन 2024’ पुरस्काराने एस.बी. ग्रुपच्या सिल्वर प्रमोटर्स अँड डेव्हलपर्सच्या सिल्वर गार्डीनिया या गृहप्रकल्पाला पुणे जिल्ह्यात तृतीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.
हेही वाचा : भारत-इंग्लंडमधील पहिला टी-२० सामना किती वाजता सुरू होईल? जाणून घ्या..
पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरात बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल प्रथम क्रमांकाने प्राइड वर्ल्ड द्वितीय क्रमांकाने न्याती ग्रुप आणि तृतीय क्रमांकाने सिल्वर ग्रुपच्या सिल्वर गार्डनिया या गृह प्रकल्पाला सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या पाहणीमध्ये कामाचा दर्जा, कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबरोबर त्यांच्या कुटुंबाच्या सुद्धा आरोग्याची काळजी तसेच सुरक्षेच्या सर्व बाबी अतिशय काटेकोरपणे पालन करून उत्तम आणि दर्जेदार असा प्रकल्प ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध करून दिल्याबद्दल सिल्वर गार्डनिया या गृह प्रकल्पाला सन्मानित करण्यात आले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
आपण करत असलेले कुठलेही काम प्रामाणिकपणे, मन लावून आणि विश्वासाने केले की त्याचे फळ मिळते. आज पिंपरी चिंचवड शहरातील महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करू शकलो याचा मला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना सार्थ अभिमान आहे.
– संतोष बारणे, एस.बी. ग्रुप सिल्वर, प्रमोटर्स अँड डेव्हलपर्स.