पिंपरी / चिंचवड
देहूरोड येथे अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/ATM-THEFT.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
देहूरोड बाजार येथे असलेल्या अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडताना पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 4) पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास करण्यात आली.
अनिकेत पोपट चव्हाण (वय 22, रा. पारशीचाळ, देहूरोड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई सोपान वालेकर यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड बाजार येथे अॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. आरोपी अनिकेत याने एटीएम मशीन मधील पैशांची चोरी करण्याच्या उद्देशाने एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेरे यांचे नुकसान केले. स्क्रू ड्रायव्हर व हातोडीच्या साह्याने एटीएम मशीनच्या समोरील पत्र्याचा दरवाजा तोडला. त्यानंतर आतील बटनांचे नुकसान केले. त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली. पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.