पिंपरी-चिंचवड : सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांची ठाणे येथे बदली
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांची ठाण्याला बदली झाली आहे. खांडेकर यांची ठाणे येथे उपमहानियंत्रक नोंदणी व उपनियंत्रक मुद्रांक म्हणून नियुक्ती झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी असलेले बाळासाहेब खांडेकर यांची १४ सप्टेंबर २०१९ रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. खांडेकर यांनी करोना काळात चांगले काम केले. नेहरुनगर येथील जम्बो कोविड केअर सेंटरची त्यांनी जबाबदारी सांभाळली.
हेही वाचा – ‘पंतप्रधान पदासाठी आमच्याकडे खूप पर्याय’; मुंबईतील बैठकीपुर्वी उद्धव ठाकरे यांचे विधान
महापालिकेत सामान्य प्रशासन विभाग, आकाश चिन्ह व परवाना, क्रीडा, निवडणूक, जनगणना, क्षेत्रीय अधिकारी अशा विविध विभागांची जबाबदारी सांभाळली. सांगली येथे पूरग्रस्त भागात मदतीसाठी गेलेल्या पथकात त्यांचा समावेश होता. महापालिकेतील चार वर्षाच्या कामाबाबत समाधानी असल्याचे खांडेकर यांनी सांगितले.