“आर्टिफिशियल इंटेलिजन्स” आपलास्मार्ट सहकारी : आयुक्त शेखर सिंह
- महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता वापराचे प्रशिक्षण

पिंपरी, : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाविषयी सध्या समाजमाध्यमांवर अनेक सकारात्मक आणि नकारात्मक मतप्रवाह दिसत आहेत. मात्र, आता हे तंत्रज्ञान केवळ भविष्यातील कल्पना न राहता, प्रत्यक्ष प्रशासकीय कामकाजाचा एक आवश्यक भाग बनत आहे. हे संकट नव्हे, तर तो आपला स्मार्ट सहकारी आहे. कार्यालयीन कामकाज अधिक जलद, सुलभ आणि अचूक होण्यासाठी प्रत्येकाने तंत्रज्ञानस्नेही होणे ही काळाची गरज आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून गुणवत्ता आणि परिणामकारकता निश्चितच वाढवू शकतो. तंत्रज्ञानाबद्दलचे गैरसमज दूर करून, त्याची अचूक समज घेतल्यास ते आपल्याला अधिक सक्षम बनवू शकते, असे मत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केले.
राज्य शासनाच्या १०० दिवसीय विशेष उपक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सुयोग्य माहिती तंत्रज्ञानाचा प्रशासनातील प्रभावी वापर’ या विषयावर आधारित सखोल प्रशिक्षण देण्यात आले, यावेळी आयुक्त शेखर सिंह बोलत होते.
या प्रशिक्षणात महाराष्ट्र ज्ञान महामंडळचे मुख्य महाव्यवस्थापक समीर पांडे व पुणे आणि उत्तर महाराष्ट्र विभागाचे विभागीय व्यवस्थापक विनायक कदम यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
हेही वाचा – राज्य सरकारचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांना गाळ, माती, मुरूम, दगड मिळणार विनामूल्य
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात पार पडलेल्या या प्रशिक्षणादरम्यान मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, उप आयुक्त विठ्ठल जोशी, मनोज लोणकर, अण्णा बोदडे, संदीप खोत, सचिन पवार, प्रदीप ठेंगल, उमेश ढाकणे,निलेश बधाणे, सीताराम बहुरे, सहशहर अभियंता अजय सुर्यवंशी, मनोज सेठिया, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, अविनाश शिंदे, विजयकुमार थोरात,निवेदिता घारगे, अमित पंडित,अजिंक्य येळे,विजयकुमार थोरात, नाना मोरे, क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे, शीतल वाकडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच कार्यकारी अभियंता आणि विभागप्रमुख उपस्थित होते.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता हे भविष्यातील प्रशासनाचे बळ आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाशी परिचित करण्यात येत आहे. हे कौशल्य भविष्यातील पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी उपयोगी ठरेल.