breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या विविध विकास कामांसाठी 36 कोटी रुपये खर्चास मान्यता

पिंपरी |महाईन्यूज|

महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या येणा-या आणि झालेल्या सुमारे ३६ कोटी ५१ लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची ऑनलाईन पध्दतीने सभा पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते.

ग क्षेत्रिय कार्यालय हद्दीतील मलनि:सारण नलिका मॅनहोल चेंबर्सची साफसफाई यांत्रिकी पध्दतीने करण्यासाठी येणा-या १ कोटी २९ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.६ मधील चक्रपाणी वसाहत, देवकर वस्ती व परिसरात स्थापत्य विषयक सुधारणा कामे करण्यासाठी येणा-या ४० लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. पिंपळे सौदागर आरक्षण क्र. ३७१ ब येथील उद्यानात स्थापत्य विषयक कामे आणि इतर अनुषंगिक कामे करण्याकामी येणा-या ५२ लाख ३० हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.९ मधील गांधीनगर, नुरमोहल्ला, जैन मंदिर, ज्योती इंग्लिश स्कूल, वसंतदादा पाटील परिसरातील रस्त्यांची हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यासाठी येणा-या ४० लाख ३८ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.९ मासुळकर कॉलनी, यशवंतनगर, उद्यमनगर परिसरातील रस्त्यांची हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्याकामी येणा-या ४० लाख ६१ हजार इतक्या, तर खराळवाडी, नेहरुनगर व इतर भागातील ठिकठिकाणी रस्त्यांची हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्याकामी येणा-या ४० लाख ५० हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मा.राष्ट्रीय हरीत लवाद यांचे आदेशाचे अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत शेवाळेवाडी ग्रांमपंचायत, ता हवेली यांना १०,००० लि. क्षमतेच्या पाण्याच्या टँकरच्या दैनंदिन पाच ट्रिप्स देण्याकामी येणा-या २६ लाख ७६ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. अ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. १० मध्ये दिवाबत्ती व्यवस्थेचे नुतनीकरण करण्यासाठी येणा-या ३२ लाख ३७ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button