breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बहिणाबाई प्राणी संग्रहालयासाठी आणखी 24 कोटींची निविदा, संग्रहालय वर्षभर बंदच

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे संभाजीनगर येथील बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय नुतनीकरण, सुशोभिकरणासाठी आठ वर्षांपासून बंद आहे. आत्तापर्यंत त्यावर 20 कोटी रुपये खर्च केले आहेत. आता सुशोभीकरणासाठी आणखी 24 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे आठ वर्षांपासून पर्यटकांसाठी बंद असलेल्या संग्रहालयास आणखी वर्षभर टाळे राहणार आहे.

प्राणी संग्रहालयासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार सर्पोद्यान व प्राणी संग्रहालयाच्या नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. 20 कोटी रुपये खर्च करुन आणि आठ वर्षे काम करुनही प्राणिसंग्रहालयाच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले नसून संग्रहालयास टाळे आहे. या कामात गैरव्यवहार झाल्याचा आणि अधिका-यांच्या हलगर्जीपणामुळे 36 प्राणी, पक्षांचा मृत्यू झाल्याचा आरोप डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात करण्यात आला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

हेही वाचा    –      मनू भाकेरने लग्नाबाबतच्या चर्चेवर सोडले मैन; म्हणाली, तो माझा..

सुशोभीकरणाची कामे पूर्ण झाल्यानंतर प्राणिसंग्रहालय महाराष्ट्र वनविकास महामंडळाकडे (एफडीसीएम) हस्तांतरीत करण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. महामंडळाने महापालिका प्रशासनाला पत्र पाठवून (केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमानुसार या प्राणिसंग्रहालयाचे काम लवकरात लवकर सुरु करुन ते पूर्ण करावे. पर्यटन वाढण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, त्याप्रमाणे सेवा-सुविधा निर्माण करण्याबाबत सूचना केली आहे. त्यामुळे महापालिकेने जुनी निविदा रद्द केली. संग्रहालयासाठी एक तज्ज्ञ अधिकारी नियुक्त केला. सल्लागार बदलण्यात आला. आराखड्यात बदल व सुधारणा करुन नव्याने निविदा प्रक्रिया राबविली आहे. प्राणिसंग्रहालय सुशोभीकरणाच्या उर्वरित कामाची 24 कोटी दोन लाख 16 हजार 68 रुपये खर्चाची निविदा स्थापत्य उद्यान विभागाने प्रसिद्ध केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button