TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रूपीनगर-तळवडे येथे सर्वपक्षीय शोकसभा ; मान्यवरांना आदरांजली !

– माजी नगरसेवक शांताराम भालेकर यांचा पुढाकाराने आयोजन

पिंपरी । प्रतिनिधी
भारतरत्न ज्येष्ठ गायिका स्व. लता मंगेशकर, अनाथांच्या माय पद्मश्री स्व. सिधुताई सपकाळ, शिवसेनेचे माजी खासदार स्व. गजानन बाबर, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख स्व. गजानन चिंचवडे, स्व. हौसाबाई भालेकर, हभप. स्व. दामू भालेकर अशा थोर व्यक्तींचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे, अशा व्यक्तींना आदरांजली अर्पित करण्यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक शांताराम बाप्पू भालेकर व मित्र परिवार यांच्या संकल्पनेतून सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन रुपीनगर तळवडे या ठिकाणी करण्यात आले होते,
या सर्वपक्षीय शोकसभेस सर्व मान्यवरांनी उपस्थित राहून दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी परिसरातील नागरिकही उपस्थित होते.


सर्वपक्षीय शोकसभा कार्यक्रमास नगरसेवक प्रविण भालेकर, नगरसेवक पंकज भालेकर, नगरसेविका पौर्णिमा सोनवणे, मा.सभापती धनंजय भालेकर, स्वी.नगरसेवक पांडुरंग भालेकर, रमेशशेठ भालेकर, ज्येष्ठ नेते शांताराम तात्या भालेकर, विलास तात्या भालेकर, मा.नगरसेवक शांताराम बापू भालेकर, सामजिक कार्यकर्ते सुखदेव अप्पा नरळे, अरुण थोपटे, मुख्याध्यापक गलांडे सर, चौधरी सर, धनंजय वर्णेकर सर, पाटोळे मामा, शिवसेनेचे नितीन बोंडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरुण वाळुंजकर, पतंगे गुरुजी, बाबुराव गावडे, गौतम मोकाशे, खान साहेब, अनिल भालेकर, रामदास कुटे, दादा सातपुते, किरण पाटील, संतोष निकाळजे, अविनाश सूर्यवंशी, शिरीष उत्तेकर, मोहन शेवाळे, मयूर बोडके, दत्ता चव्हाण, रविराज शेतसंधी, विनोद नवले, चेतन तळपे, सोमनाथ तुपे, राहुल पिंगळे, लतीफ भाई सय्यद, मनसेचे विशाल मानकरी, संजय सावंत, अय्याजभाई शेख, तेजस घोडके, योगेश सावंत, अविनाश सूर्यवंशी, अनिल भालेकर, बाबुराव लहाने, देविदास भोज, भिंगारे मामा, कमलेश भालेकर, बाबर मामा, गुरसाळी काका, ढवळे काका, तसेच सामाजिक कार्यकर्त्या अस्मिताताई भालेकर, शितलताई वर्णेकर, संगीताताई देशमुख, आशाताई भालेकर, सौ. जाधव ताई व बहुसंख्येने रुपीनगरवासीय नागरिक हजर होते.
यावेळी सर्वांनी काही काळ मौन पाहून दिवंगताना श्रद्धांजली अर्पण केली. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या शोकसभेचे आयोजन माजी नगरसेवक शांताराम कोंडीबा भालेकर उर्फ एस.के.बाप्पू आणि मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button