breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘पुणे पोर्श अपघात प्रकरण जलदगती न्यायालयात वर्ग करा’; ॲड. संदीप चिंचवडे

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी

पुण्याच्या सुरक्षेबाबत सतर्कता बाळगण्याची अपेक्षा

पिंपरी-चिंचवड | पुणे येथील झालेल्या पोर्श अपघातातील दोन्ही मुलांच्या कुटुंबीयांना शासनाकडून भरपाई द्यावी. आरोपी बिल्डर व त्यांच्या पुत्रावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी. महाराष्ट्रातील जनता या प्रकरणी हळहळ व्यक्त करत आहे. यासाठी पोलिसानी तपासात कसल्याही प्रकारच्या उणीवा राहू नये यासाठी खबरदारी घ्यावी.यासाठी विशेष वकिलांची नेमणूक करावी. या प्रकरणी जलदगती न्यायालयात हे प्रकरण वर्ग करण्यात यावे यासाठी लक्ष द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. सचिन चिंचवडे यांनी केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पुणे पोर्श अपघात प्रकरणातील अपराधी व्यक्ती या मोठ्या सधन कुटुंबातील असल्यामुळे त्यांच्याकडून तपास अथवा न्यायालयात या प्रकरणी उणीवा ठेवण्याच्या अनेक शक्यता आहेत त्यामुळे आपण जातीने याकडे लक्ष घालावे.या पूर्वीच मद्याचा पुरावा रिपोर्ट मध्ये नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. सरकारने या प्रकरणात कसूर केल्यास किंवा आरोपी खुले सुटल्यास येत्या विधानसभा निवडणुकांना सामोरे जाताना सरकारला कसरत करावी लागेल याची दक्षता घ्यावी, अशी आमची मागणी आहे.

हेही वाचा     –    ‘महात्मा गांधींना कोणी ओळखत नव्हतं, चित्रपट बनला तेव्हा..’; पंतप्रधान मोदींचं विधान चर्चेत

पुणे शहरामध्ये अनेक पब्झ अव्याहतपणे रात्रभर चालू आहेत. त्या बरोबरीने दारू अंमली पदार्थ हुक्का हे देखील सुरू आहे. पोलिस खाते याला मदत करीत आहे.मोठे मोठे राजकारणी आणि गुंड आणि पोलिस अधिकारी अशी भागीदारी काही ठिकाणी असल्याची माहिती बाहेर आम्ही ऐकतो आहे. खरे खोटे पोलिसाना माहीत आहे.परंतु आपण त्यांना बंद करू शकत नाही असे दिसते आहे कारण पोलिसांनी ठरवले तर हे चालू पण राहू शकत नाही, असेही ॲड. चिंचवडे यांनी म्हटले आहे.

बिल्डर,व्यापारी,अधिकारी स्वतः,शिवाय यांची मुले,तसेच बाहेरील राज्यातील सधन कुटुंबातील मुले या ठिकाणी येत असतात त्यामुळे व्यवसाय पण तितकाच मोठा हफ्ते पण तितकेच मोठे मिळत असतील. मोठ्या फाईवस्टार हॉटेल्स मध्ये देखील हे पब्स् चालू आहेत त्याठिकाणी देखील बाहेरच्या देशातील तरुण तरुणी येत असतात तिथेही हीच परिस्थिती आहे. कायद्याचा धाक राहिलेला नाही.संस्कृती तर खूप लांब पुणे तर शिक्षणाचे माहेरघर संस्कृतीचे शहर कुठे चालले आहे? पुणे शहर मुंबई व्हायला वेळ लागणार नाही असे दिसते आहे. नियम धाब्यावर बसवून दारू विक्री चालू आहे, असेही ॲड. चिंचवडे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

पोर्श अपघात प्रकरणात जलदगती न्यायालयात वर्ग करण्यात यावे. जलदगतीने या प्रकरणात न्याय मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली आहे. आरोपीला शिक्षा होण्याची गरज आहे.त्यासाठी निष्णात वकील राज्य सरकार चे वतीने नियुक्त करण्यात यावे. पोलिसांनी चार्ज शीट अथवा गुन्ह्याच्या तपासात कोणत्याही प्रकारची उणीव ठेवू नये यासाठी प्रयत्न करावे. दारू व्यतिरिक्त या आरोपींनी कोणते अंमली पदार्थ किंवा तत्सम पदार्थ सेवन केले होते का याची पण चौकशी व्हावी. अंमली पदार्थ विकणाऱ्यांवर वर आळा घालावा. त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी. पुणे शहराला या अंमली पदार्थांच्या विळख्यातून सोडवण्याची आवश्यकता आहे.

– ॲड. संदीप चिंचवडे, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button