breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

छत्रपती संभाजी महाराज स्मारक घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करावी

शहरातील संतप्त शंभू प्रेमींची मागणी.

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मोशी येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याचे काम सुरू आहे.सदर स्मारकाची जागा पूर्वी दुसऱ्या ठिकाणी निश्चित करण्यात आली होती त्या ठिकाणी महानगरपालिकेने पाच कोटींच्या वर खर्च केल्यानंतर ती जागा बदलली यामुळे महानगरपालिकेचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले. यास जबाबदार अधिकाऱ्यांकडून सदर रकमेची वसुली करावी तसेच झालेल्या नुकसानी बद्दल सदर अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच नवीन जागेत स्मारक उभारण्याचे काम देताना योग्य ती काळजी घेतली नाही चौथरा उभारण्याचे व सुशोभीकरणाचे काम अनुभवी ठेकेदाराला देणे आवश्यक होते.

तसेच शंभर फुटी भव्य दिव्य छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम अनुभवी शिल्पकारास निविदा काढून स्पर्धात्मक पद्धतीने देणे बंधनकारक असताना चौथरा बांधणे सुशोभीकरण करणे पुतळा उभारणे असे पूर्ण काम बेकायदेशीर पद्धतीने एकाच ठेकेदाराला दिले. यामुळे सदर कामात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा संशय शंभू प्रेमी नागरिक व्यक्त करत आहेत. तसेच ज्या शिल्पकारास काम दिले ते प्रत्यक्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने न देता धनेश्वर ठेकेदारामार्फत दिले हा भ्रष्टाचाराचा आगळावेगळा नमुना आहे. सदर पुतळ्याचे काम निकृष्ट झाल्याचे नुकतेच उघडकीस आले पुतळ्याचे छोटे छोटे पार्ट बनवलेले असून त्यांना तडे गेल्याचे उघडकीस आले आहे.

हेही वाचा    –      ..तर मी राष्ट्रवादीत परत जाईन; एकनाथ खडसेंचं भाजप प्रवेशावर मोठं विधान 

सदर पुतळ्याचे पार्ट महानगरपालिकेने व संबंधितांनी गवत उगवलेल्या अस्वच्छता व घाण पाणी असलेल्या जागेत ठेवण्यात आले आहेत.
महानगरपालिकेच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे आमचे दैवत स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान झाला आहे.
याबद्दल आज शहरातील सर्व शंभू प्रेमी संघटनांच्या वतीने महानगरपालिका व आयुक्त शेखर सिंह यांचा निषेध करण्यात आला बहुसंख्येने उपस्थित नागरिकांनी निदर्शने केली तसेच शंभू प्रेमींच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे,मारुती भापकर, प्रकाश जाधव राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे सुलक्षणा शीलवंत धर प्रताप गुरव,धम्मराज साळवे,नरेंद्र बनसोडे,मनोज गरबडे,धनाजी येळकर यांनी आपल्या भाषणातून झालेल्या कृतीबद्दल तीव्र संताप व्यक्त करून निषेध व्यक्त केला.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष वैभव जाधव सचिव रावसाहेब गंगाधरे, विनायक मनसुभे,सामाजिक कार्यकर्ते अरूण पवार जिजाऊ ब्रिगेडच्या सुनीता शिंदे सुलभा यादव,संध्या जोगदंड,रमेश कदम,कौशल्या जाधव,पांडुरंग प्रचंडराव,वसंत पाटील,अशोक सातपुते,किरण खोत,दत्तात्रेय कांगळे,संतोष जोगदंड,गिरीश वाघमारे यांच्यासह शहरातील शंभू प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते निषेध आंदोलनाचे आयोजन संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button