ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
बेकायदेशीरपणे कोयता बाळगल्या प्रकरणी थेरगाव आणि रहाटणीत कारवाई
![Action in Thergaon and Rahatni in case of illegal possession of sickle](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/koyta.jpg)
पिंपरी चिंचवड | बेकायदेशीरपणे कोयता बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी थेरगाव आणि रहाटणी परिसरात दोन कारवाया केल्या.दोन्ही कारवायांमध्ये पोलीस नाईक मोहम्मद गौस रफिक नदाफ यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पहिली कारवाई रहाटणी येथे गुरुवारी (दि. 2) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास करण्यात आली. एका अल्पवयीन मुलाला कोयता बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई गुरुवारी रात्री साडेसात वाजता थेरगाव गावठाण येथे करण्यात आली. यात प्रमोद बाबासाहेब गायकवाड (वय 21, रा. थेरगाव गावठाण) आणि एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही कोयता बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास वाकड पोलीस करीत आहेत.