साते गावाजवळ पायी पालखीमध्ये टेम्पो घुसल्याने अपघात; 20 वारकरी जखमी
पुणे | मावळ तालुक्यातील साते गावाजवळ आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास आळंदीकडे पायी जाणार्या पालखीमध्ये भरधाव वेगाने येणारा पिकअप टेम्पो घुसल्याने अपघातात झाला आहे. या भीषण अपघातात २६ वारकरी जखमी झाले असून २ वारकरी दगावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.संजीवन समाधीसाठी माउली कृपा चरिटेबल ट्रस्ट, खालापूर येथील तब्बल २०० वारकरी पायी आळंदीच्या दिशेने चालले होते. आज सकाळी सहाच्या सुमारास भरधाव वेगाने येणारा पिकअप टॅम्प या पायी चालणाऱ्या वारीमध्ये घुसल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये २६ वारकरी जखमी तर २ वारकऱ्यांचा म्रुत्यु झाल्याची प्राथमिक माहिती समोर अली आहे. जखमींना कामशेत येथील विकेश मुथा यांच्या रुग्णालयांत दाखल करण्यात अली आहे.
घटनेची माहित मिळताच पोलीस घटना स्थळी दाखल होऊन. जखमींना रुग्णालयांत दाखल करण्यात आल्याची माहिती वडगावचे पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी दिली.