जगताप डेअरी साई चौकातील ग्रेड सेपरेटरच्या कामाला गती द्या – नाना काटे
![Accelerate the work of Grade Separator at Jagtap Dairy Sai Chowk - Nana Kate](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/nana-kate.jpg)
पिंपरी – पिंपळे सौदागर येथील जगताप डेअरी साई चौकातील ग्रेडसेपरेटरच्या कामाला गती द्यावी. काम लवकर पूर्ण करावे. ग्रेडसेपेरटर वाहतुकीसाठी नागरिकांरिता खुला करावा अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते, जेष्ठ नगरसेवक नाना काटे यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले. त्यात नगरसेवक काटे यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक 28 रहाटणी – पिंपळे सौदागर येथील जगताप डेअरी साई चौक येथे नाशिक फाटा ते हिंजवडी या बीआरटीएस मार्गावर पिंपळेसौदागर व वाकडला जोडणा-या ग्रेड सेपरेटरचे काम सुरु आहे. या ग्रेट सेपरेटरचा एक मार्ग काही दिवसापूर्वी खुला करण्यात आला.
दुसऱ्या मार्गाचे काम सुरु असून ते खूप संथ गतीने सुरू आहे. या मार्गावर वाहनाची खूप वर्दळ असते. सध्या वर्क फ्रॉम होम असल्याने तसेच बहुतेक आटी पार्क बंद असल्याने वर्दळ कमी आहे. त्यामुळे पिंपळे सौदागर जगताप डेअरी साई चौक येथील ग्रेड सेपरेटरचे संथ गतीने सुरु असलेले काम लवकरात लवकर पूर्ण करावे. संबंधित काँट्रॅक्टर व अधिकारी यांना सूचना देऊन हा ग्रेड सेपरेटर नागरिकांसाठी खुला करण्यात यावा.