मोशीतील सामाजिक कार्यकर्ते निलेश बोराटे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा वर्षाव
भव्य नोकरी महोत्सवाचा यशस्वी समारोप : २ हजार ५०० हून अधिक युवक-युवतींचा सहभाग

पिंपरी-चिंचवड | मोशी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते निलेश बोराटे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये भव्य नोकरी महोत्सव, वृक्षारोपण, भजनी मंडळ सन्मान, सफाई कर्मचारी सन्मान, अनाथ आश्रमांमध्ये अन्नदान तसेच भव्य रक्तदान शिबीर अशा उपक्रमांचा समावेश होता. आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नोकरी महोत्सवाला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
श्री निलेश बोराटे सोशल फाऊंडेशन आणि लक्ष्य फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य नोकरी महोत्सवाचा आज यशस्वी समारोप झाला. या महोत्सवात परिसरातील २,५०० पेक्षा अधिक युवक-युवतींनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे, उपस्थितांपैकी 50-60% उमेदवारांना त्वरित नोकरीची संधी मिळाली तर उर्वरित उमेदवारांना पुढील मुलाखतींसाठी बोलावण्यात येणार आहे.

नामांकित कंपन्यांचा सहभाग
महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे परिसरातील आणि बाहेरील अनेक नामांकित कंपन्यांची थेट उपस्थिती. कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उमेदवारांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या कौशल्यांनुसार रोजगार उपलब्ध करून दिले. त्यामुळे रोजगाराच्या शोधात असलेल्या अनेक तरुणांना करिअरच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्याची संधी मिळाली.
हेही वाचा : ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमात कसे सहभागी व्हाल अन् सर्टिफिकेट मिळवाल?
समाजोपयोगी उपक्रमांतून सामाजिक बांधिलकीची जाणीव
नोकरी महोत्सवाबरोबरच निलेश बोराटे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, सफाई कर्मचारी सन्मान, भजनी मंडळ सन्मान, अनाथाश्रमांमध्ये अन्नदान आणि रक्तदान शिबीर यासारख्या उपक्रमांमधून सामाजिक बांधिलकीची जाणीव प्रकर्षाने दिसून आली. या उपक्रमांना स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि विविध सामाजिक संस्थांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

आयोजकांचे आभार प्रदर्शन
कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल बोलताना निलेश बोराटे यांनी उपस्थित सर्व युवक-युवती, कंपन्यांचे प्रतिनिधी, नागरिक आणि आयोजक टीमचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, “रोजगाराची संधी – उज्ज्वल भविष्यासाठी नवा मार्ग या ध्येयाने आयोजित नोकरी महोत्सव हा स्थानिक तरुणाईला रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक महत्वाचा टप्पा ठरेल.”




