ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
नांदेड फाटा येथील भाऊ इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये एका कंपनीत भीषण आग, एकापाठोपाठ एक स्फोट
![A company fire at Bhau Industrial Estate in Nanded Fata, one blast after another](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/IMG-20210916-WA0000-e1631774444914-1.jpg)
पुणे | पुण्यातील नांदेड फाटा येथील भाऊ इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये एका कंपनीत भीषण आग लागली असून, यात काही कामगार अडकले आहेत. जवानांना पहिला मृतदेह सापडला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. केमिकल असल्याने एकापाठोपाठ एक स्फोट होत आहेत.नांदेड फाटा येथे भाऊ इंडस्ट्रीज आहे. येथे मोठं-मोठ्या कंपन्या आहेत. त्यातील एका कंपनीला सकाळी आग लागली. ही माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दल, 8 अग्निशमन वाहने दाखल झाले आहेत.
कंपनीत केमिकल असल्याने स्फोट होत आहेत. त्यामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली आहे. या कंपनीत काही कामगार महिला अडकल्याचे सांगितले जात होते. अग्निशमन जवानांनी पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यावेळी एक मृतदेह मिळून आला आहे. यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.