पिंपरी / चिंचवड

कार्यालयात घुसून तोडफोड केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

बालाजीनगर भोसरी येथील एका कार्यालयात घुसून दोघांनी तोडफोड केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 7) रात्री साडेसात वाजता महेंद्र सरवदे यांच्या संपर्क कार्यालयात घडली.

अनिता लक्ष्मण सरवदे (वय 50, रा. बालाजीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप नलावडे (रा. बालाजीनगर, भोसरी) आणि एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काहीही कारण नसताना फिर्यादी यांचा मुलगा महेंद्र यांच्या संपर्क कार्यालयात घुसून आरोपींनी तलवार व लोखंडी पाईपने तोडफोड केली. यातऑफिस मधील संगणक आणि इतर साहित्याचे नुकसान झाले. तोडफोड केल्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या शेजारी राहणारा मुलगा भैया नवगिरे याला हाताने मारहाण करून फिर्यादी यांचा मुलगा महेंद्र सरवदे याला मारण्याची धमकी दिली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button