ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

१४ वर्षीय मुलीवर आईच्या मानलेल्या भावाने केला बलात्कार

पुणे (पिंपरी-चिंचवड)| पिंपरीतील काळेवाडी परिसरात एका १४ वर्षीय मुलीवर बलात्कार झाला असून पीडित मुलगी ४ महिन्यांची गरोदर आहे. पीडितेच्या आईच्या मानलेल्या भावानेच हे कृरकृत्य केले असून, हा नराधम मागील ४ ते ६ महिन्यांपासून हे घाणेरडे कृत्य करत होता. तेजस अहिवळे असं आरोपीचं नाव असून तो पीडित मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असूनसुद्धा तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता. आश्चर्याची बाब म्हणजे मागील ४ ते ६ महिन्यांपासून पीडितेच्या घरातच आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. मात्र, पीडित मुलगी जेव्हा गरोदर असल्याचं निष्पन्न झालं तेव्हाच हा सर्व प्रकार उघडकीस आला.

आई-वडिलांना मारायची द्यायचा धमकी…

पीडितेच्या आईचा मानलेला भाऊ असलेल्या तेजसची त्यांच्या घरी येजा असायची. पीडितेच्या आईने तेजसला भाऊ मानलेला असल्याने त्याचा घरात मुक्त वावर होता आणि त्याच्यावर घरातल्या व्यक्तींचा विश्वास होता. ह्याच विश्वासाचा फायदा घेत तेजसने ह्या चिमुरडीवर अत्याचार केला. ‘घरात जर कुणालाही काही सांगितले तर तुझ्या आईवडिलांना मारून टाकेन’, अशी धमकी तेजसने संबंधित मुलीला दिली होती. त्यामुळे भीतीपोटी ह्या सर्व प्रकारची कुठलीही कल्पना पीडीतीने तिच्या घरच्यांना दिली नव्हती. मात्र, जेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला तेव्हा ही १४ वर्षीय चिमुरडी चार महिन्यांची गरोदर होती. आरोपी तेजसला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनेकदा अनोळखी लोकं कामानिमित्त किंवा वेगवेगळ्या कारणांमुळे एकमेकांच्या संपर्कात येतात. कालांतराने ओळख वाढत जाते आणि पुढे जाऊन मित्र मैत्रीणी बनतात. बऱ्याचदा काही व्यक्ती मैत्रीच्याही पलीकडे जाऊन वेगवेगळी नाती बनवतात. मानलेला भाऊ, मानलेली बहीण, मानलेले वडील किंवा आई अशी नाती वेगवेगळ्या कारणांमुळे अधिक घट्ट होतात आणि एकेकाळचे दोन अनोळखी व्यक्ती जवळचे वाटू लागतात. बहुतांश लोकं ह्या नात्यांच्या आदर आणि पवित्रता राखत कुठल्याही अपेक्षेशिवाय नातं जपतात. मात्र, अनेकदा अनोळखी लोकांसोबत बनवलेली नाती कशी धोकादायक ठरू शकतात याचाच प्रत्यय पिंपरीतील चिमुरडीवर झालेल्या अत्याचारावरून येतो.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button