Breaking-newsपिंपरी / चिंचवड
पवना नदीपात्रात अज्ञात युवकाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/Screenshot_2018-12-15-21-26-32-779_com.google.android.googlequicksearchbox-1080x650.jpg)
पिंपरी, – लोढा सिटीच्या आवारातील पवना नदीपात्रात अज्ञात युवकाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सोमवारी रात्री आढळून आला.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत रावेत येथे पवना नदीपात्रालगत लोढा सिटी आहे. या नदीपात्रातच लोढा सिटीतील रहिवाशांसाठी बोट क्लब बांधण्यात आला आहे. या बोटक्लबच्या विरुद्ध किनाऱ्यावर सोमवारी रात्री एक मृतदेह आढळला. या मृतदेहाच्या कंबरेला लोखंडी तार गुंडाळलेली असून, घातपाताचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. युवकाची अद्याप ओळख पटलेली नाही. त्याच्या हातावर ‘ओम’ असे गोंदलेले आहे. नदीच्या प्रवाहातून हा मृतदेह वाहत आल्याची अथवा तो तेथे कोणी तरी आणून टाकला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. सोमवारी या ठिकाणी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली