प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये ८६ जणांचे उत्स्फूर्त रक्तदान
शिक्षण विश्व : विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पिंपरी-चिंचवड | प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये सामाजिक बांधिलकी जोपासत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटच्या एमबीए व एमसीए विभागातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि सेवक वर्ग असे एकूण ८६ जणांनी रक्तदान करून समाजसेवेचे मोलाचे उदाहरण घातले.
कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा आणि संचालिका डॉ. तेजल शहा यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. एमबीएचे संचालक डॉ. सचिन बोरगांवे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वाटपही करण्यात आले.
हेही वाचा : London | ‘डी. वाय. पाटील अभियांत्रिकी’च्या माजी विद्यार्थ्यांचा उत्साहात मेळावा
शिबिराच्या यशासाठी प्रा. मनीष पाटणकर, प्रा. गुरुराज डांगरे, प्रा. अश्विनी जोशी, प्रा. तुलिका चतर्जी, समन्वयक दत्तात्रय येवले, विद्यार्थी प्रतिनिधी कृष्णन पाटील, वैभव महाजन तसेच मोरया ब्लड सेंटरच्या डॉ. प्रक्षाली गांधी यांनी विशेष परिश्रम घेतले. रक्तदान शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.




