Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तक

London | ‘डी. वाय. पाटील अभियांत्रिकी’च्या माजी विद्यार्थ्यांचा उत्साहात मेळावा

लंडनमध्ये ४५ माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती; आठवणींना दिला उजाळा

लंडन | कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य मेळावा लंडनमधील पार्क प्लाझा व्हिक्टोरिया येथे उत्साहात पार पडला. लंडनमध्ये नोकरी व व्यवसायानिमित्त स्थायिक झालेल्या ४५ माजी विद्यार्थ्यांनी या मेळाव्यात उपस्थित राहून जुन्या आठवणींना उजाळा दिला.

मूळचे गडहिंग्लजचे आणि सध्या लंडनमध्ये ‘कोका-कोला’चे संचालक म्हणून कार्यरत असलेले राजेश महाजन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करताना त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणामुळे जगभरात मिळालेल्या संधींचा उल्लेख केला.

डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील म्हणाले, “संस्थापक डी. वाय. पाटील यांनी १९८४ मध्ये दूरदृष्टीने संस्था उभी केली. आज आमचे माजी विद्यार्थी जगभरात मोठ्या पदांवर कार्यरत आहेत, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. माजी विद्यार्थी हेच संस्थेचे खरे ‘ब्रँड अॅम्बेसिडर’ आहेत.”

हेही वाचा      :            चऱ्होलीतील सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा साळुंके यांच्याकडून सेवाभावी वृत्तीचे आदर्शवत उदाहरण

विश्वस्त तेजस पाटील यांनी “संस्थेने चार दशकांपासून अष्टपैलू विद्यार्थी घडवण्याचे कार्य यशस्वीपणे केले असून पुढील काळात माजी विद्यार्थी व संस्थेतील नाते अधिक दृढ करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील,” असे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी केले. केमिकल विभागप्रमुख डॉ. के. टी. जाधव यांनी स्वागत केले, तर संचालक डॉ. अजित पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. मेळाव्यात चेतन ओझा, मेनका भारद्वाज, ऋषिकेश देशपांडे, संदीप पाटील, निकेत साबळे, अल्ताफ जसनाईक, प्रीती रणभिसे, ऋतुजा पाटील, सूरज पाटील आदी माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संयोजन माजी विद्यार्थी विभागाच्या समन्वयक डॉ. मनीषा भानुसे, साईदत्त सबनीस आणि अरिहंत आडके यांनी केले.

माजी विद्यार्थी हा आमच्या संस्थेचा सर्वात मोठा गौरव आहे. जगातील कोणत्याही देशात त्यांची यशस्वी उपस्थिती दिसली की संस्थेच्या कार्याचा खरा परिणाम जाणवतो. पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी अशी ही परंपरा माजी विद्यार्थ्यांनी पुढेही कायम ठेवावी, हीच अपेक्षा.

– डॉ. संजय पाटील, अध्यक्ष, डॉ. डी.वाय. पाटील ग्रुप.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button