शहरातील 671 शाळा झाल्या सुरु; पहिल्या दिवशी विद्यार्थी संख्या कमी
![671 schools started in the city; The number of students decreased on the first day](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/Schools-to-Reopen-1.jpg)
पिंपरी चिंचवड | कोरोनाची रुग्णसंख्या घटल्याने पहिली ते सातवीपर्यंतच्या खासगी आणि महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. कोरोनाविषयक दक्षता घेऊन शहरातील 671 शाळा सुरू झाल्या आहेत. गुलाबपुष्प, चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. पहिल्या दिवशी पटसंख्या कमी नोंदविली गेली.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य शासनाने प्राथमिक आणि माध्यमिक शाळा 1 डिसेंबरपासून सुरू कराव्यात, असे आदेश दिले होते. मात्र, ओमायक्रॉनचे रुग्ण पिंपरी – चिंचवड आणि पुणे शहरात आढळून आल्याने पंधरा डिसेंबरपर्यंत शाळा सुरू न करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. त्यानंतर आजपासून शहरातील शाळा सुरू झाल्या आहेत.
शहर परिसरात महापालिकेच्या सातवीपर्यंत 105 शाळा आहेत. या शाळा आजपासून सुरू झाल्या. शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत म्हणाले, महापालिकेच्या शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. पहिल्या दिवशी काही शाळांममध्ये पन्नास टक्के उपस्थिती होती. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारात शाळा सुरू राहणार आहेत. खासगी शाळांनाही कोविड नियमांचे पालन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.