breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहरात डेंग्यूचे 57 रुग्ण

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात डेंग्यू आजाराचे 57  रुग्ण, चिकुनगुण्या आजाराचे 7 रुग्ण व झिका आजाराचे 2 रुग्ण आढळुन आलेले आहेत. झिका आजाराचे दोन्ही रुग्णांना घरी सोडण्यात आलेले आहे.

महानगरपालिकेच्या परिसरात हिवताप, डेंग्यू, चिकुनगुण्या व झिका या आजारांच्या साथीचा प्रादुर्भाव वाढू नये याकरीता पावसाळयाच्या दिवसामध्ये काळजी घेणे आवश्यक आहे.  आजाराच्या प्रतिबंधाकामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने  “ डेंग्यु मुक्त पीसीएमसी(BEAT Dengue Campaign)” मोहिमेची सुरुवात केलेली आहे. या मोहिमेअंतर्गत विविध समाजमाध्यमे, शहरातील मॉल्स, सिनेमागृहे, मनपाचे डिजिटल बोर्ड्स, Public Announcement Systems इत्यादी द्वारे डेंग्यु, चिकुनगुण्या व झिका या आजारांबाबत जनजागृती करण्यात आली.

हेही वाचा    –      महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला काय? अजित पवार म्हणाले.. 

डेंग्यु, चिकुनगुण्या व झिका आजारांच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय विभागामार्फत करण्यात आलेली कार्यवाही खालीलप्रमाणे आहे. डेंग्यु मुक्त पीसीएमसी (BEAT Dengue Campaign)” अंतर्गत प्रत्येक आठवडा एक दिवस एक तास या मोहिमेअंतर्गत नागरीकांनी आपल्या घराच्या आतील व बाहेरील पूर्ण परिसराचे परिक्षण करावे पाणी साचणारी सर्व ठिकाणे (डासोत्पत्ती स्थाने) नष्ट करावी. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे कि, कोणत्याही प्रकारचा ताप व इतर लक्षणे असल्यास त्वरित तज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button