महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या जनसंवाद सभेत ५३ तक्रार वजा सूचना प्राप्त
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/BJP-government-83-780x470.jpg)
पिंपरी : महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज जनसंवाद सभा पार पडली. यावेळी एकूण ५३ तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन सर्व क्षेत्रिय कार्यालयात करण्यात येते. त्यानुसार आज महापालिकेच्या वतीने सर्व क्षेत्रीय कार्यालयात जनसंवाद सभा पार पडली. यावेळी महापालिकेच्या नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भूषविले.
हेही वाचा – ‘फक्त कपड्याचा रंग निळा असला म्हणजे…’; परभणी दौऱ्यावरून नारायण राणेंचा राहुल गांधींना टोला
महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयामध्ये आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी सहभाग घेऊन एकूण ५३ तक्रारवजा सूचना मांडल्या. यामध्ये अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अनुक्रमे १५, ५, ७, ५, ५, ७, १ आणि ८ तक्रारी वजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.
आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारी व सूचना मांडल्या. यामध्ये अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करणे, दिशादर्शक फलक दुरूस्ती करणे, बेवारस वाहनांवर कारवाई करणे अशा सूचनांचा मुख्यत्वे समावेश आहे. याव्यतिरिक्त नियमित पाणीपुरवठा करणे, नवीन नळ जोडणी करणे, ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करणे, स्वच्छतागृहांची स्वच्छता राखणे, पथदिव्यांची व्यवस्था करणे, पदपथांवरील खचलेले ब्लॉक दुरूस्त करणे आदी तक्रारी नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.