Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ताफ्यात ५० नवीन वाहने दाखल

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या ताफ्यात नव्याने ८ चारचाकी व ४२ दचाकी वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे पोलिसांच्या आपत्कालीन प्रतिसाद क्षमतेत वाढ होऊन नागरिकांना अधिक जलद व परिणामकारक सेवा मिळणार आहे.

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस दलाचे आधुनिकीकरण आणि सुसज्जता वाढविण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही नवीन वाहने ताफ्यात दाखल करण्यात आली आहेत.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार हातो घेतला त्यावेळी पोलीस दलात मोटार सायकल १८०, कार १२, जीप १०९, लाईट व्हॅन-१२, बस ०६ अशी एकुण ३१९ वाहने उपलब्ध होती. सदरची वाहने आयुक्तालयाच्या वाढत्या कामकाजाच्या तुलनेत फारच कमी होते. पोलीस कामकाज परिणामकारक करण्याचे दृष्टीने वाहनांची संख्या वाढविणे आवश्यक होते.

हेही वाचा –  ‘नारायण राणे म्हणजे धडाडीचे नेतृत्व आणि मार्गदर्शक दीपस्तंभ’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

त्या दृष्टीने त्यांनी पोलीस महासंचालक कार्यालय व जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवुन सातत्यपूर्ण पाठपुरावा करुन त्यांच्या कार्यकाळात एकुण ३६७ वाहने पोलीस आयुक्तालयासाठी उपलब्ध केली आहेत. त्यामध्ये जिल्हा नियोजन समितीकडुन मोटार सायकल १०२, जीप १५७, लाईट व्हॅन-३ व ट्रक-१ अशी एकुण २६३ वाहने प्राप्त केली आहेत. त्यापैकी २५ मोटारसायकल हया बजाज कंपनीने पुरस्कृत केलेल्या आहेत. तसेच पोलीस महासंचालक कार्यालयाकडून मोटार सायकल-७१, कार-०२, जीप-०१, लाईट व्हॅन-१६, बस-१३, टॅन्कर-०१ अशी एकुण १०४ वाहने प्राप्त केली आहेत.

या नव्या वाहनांमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, आपत्कालीन घटनांना तत्काळ प्रतिसाद देणे तसेच नागरिकांना वेळेवर मदत पोहोचवणे अधिक सुलभ होणार आहे, असा विश्वास पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी व्यक्त केला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button