गुणवत्ता महिना स्पर्धेत 360 जणांचा उत्स्फूर्त सहभाग
शिक्षण विश्व: कॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या पुणे चॅप्टरच्या वतीने आयोजन

पिंपरी चिंचवड: गुणवत्ता स्पर्धा २०२५ द्वारे गुणवत्ता महिना साजरा करणे हे एक जबरदस्त यश होते. उत्साही सहभाग, अंतर्दृष्टीपूर्ण केस स्टडीज, सर्जनशील अभिव्यक्ती आणि मजबूत उद्योग प्रतिनिधित्व यामुळे या कार्यक्रमाने संस्कृती म्हणून गुणवत्तेचे महत्त्व अधोरेखित केले. कॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया पुणे चॅप्टर ने विकसित भारताच्या दृष्टिकोनात योगदान देऊन, संस्थांमध्ये व्यवसाय उत्कृष्टता आणि टीक्यूएम पद्धतींना चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया पुणे चॅप्टरने भोसरी येथील क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटर येथे क्वालिटी स्पर्धा २०२५ आयोजित करून क्वालिटी महिना साजरा केला. हे सलग १२ वे वर्ष आहे, ज्यामुळे एकूण गुणवत्ता व्यवस्थापन ( टीक्यूएम) आणि उद्योगांमध्ये सतत सुधारणांना प्रोत्साहन देण्याच्या चॅप्टरच्या वचनबद्धतेला बळकटी मिळाली.
या कार्यक्रमात ४२ उद्योग संस्थांमधील ३६० जणानी सहभाग घेतला. एकूण १५१ नामांकने मिळाली. ८६ केस स्टडी, १ स्किट्स, ३८ पोस्टर्स आणि २४ स्लोगन. या स्पर्धेत संघांनी त्यांची गुणवत्ता सुधारणा यशोगाथा, स्लोगन, पोस्टर आणि स्किट सादर केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जेबीएम ग्रुपचे सहाय्यक उपाध्यक्ष मिलिंद जठार यांनी दीपप्रज्वलन करून केले. क्यूसीएफआय चे माजी राष्टीय अध्यक्ष सतीश काळोखे आणि कौन्सिल सदस्य माधव बोरवणकर, संजीव शिंदे, अनंत क्षीरसागर, प्रकाश यार्दी हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
हेही वाचा – महाराष्ट्र सिकलसेलमुक्त करण्यासाठी मिशन मोड काम करण्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश
समारोप सत्राचे प्रमुख पाहुणे अभिजीत डाय अँड टूल्स ग्रुपचे सीईओ जयमुरुगन थांगवले होते. क्यूसीएफआय चे माजी राष्टीय अध्यक्ष सतीश काळोखे यांनी प्रमुख पाहुण्यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले.
केस स्टडीच्या मूल्यांकनासाठी परीक्षक मनीष फाले , प्रशांत मुधलवाडकर , वेंकटेश राव, अजय अंबिके, शिरीष शहाणे, राहुल रणाळकर, विठ्ठल वाकचौरे आणि रितू मेहता होते. घोषवाक्य आणि पोस्टर मूल्यांकन, धनंजय वाघोलीकर आणि परवीन तरफदार यांनी केले. पवनकुमार रवंदळे यांनी गुणवत्तेवर प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली.
परीक्षक, प्रमुख पाहुणे जयमुरुगन थांगवले आणि क्यूसीएफआय पुणे चॅप्टर कौन्सिल सदस्यांच्या हस्ते विजेत्याना सुवर्ण , रौप्य व कास्य पदक पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया रुमाले यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रशांत बोराटे, रहीम मिर्झाबेग व चंद्रशेखर रुमाले यांनी केले.




