23 जुलैनंतर लॉकडाऊन नसणार, जिल्हाधिकारी राम यांची माहिती
पुणे/ पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
लॉकडाऊनमुळे वैतागलेल्या नागरिकांना आता पुन्हा लॉकडाऊन वाढतो की काय, अशी भिती वाटू लागली आहे. परंतु, आता २३ जुलैनंतर पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्ह्यात लॉकडाउन नसेल, अशी सूचक माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली आहे. त्यामुळे पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांसाठी ही दिलासादायक बाब ठरणार आहे.
सोमवारी माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी राम म्हणाले, करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता १० दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला. या काळात नागरिकांनी प्रशासनाला चांगले सहकार्य केले. त्यामुळे या लॉकडाउननंतर पुन्हा लॉकडाउन असणार नाही. मात्र, या पुढील काळात देखील आजपर्यंत शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन नागरिकांना करावे लागणार आहे. नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कठोर कारवाई प्रशासनाकडून केली जाणार आहे, अशीही माहिती जिल्हाधिकारी राम यांनी दिली आहे.