पिंपरी / चिंचवड
निगडीत महिलेकडून 22 हजारांचा गांजा जप्त
पिंपरी l प्रतिनीधी
एका महिलेच्या ताब्यातून 21 हजार 850 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 16) ओटास्कीम, निगडी येथे करण्यात आली.
सविता सचिन पवार (वय 28, रा. पेरूची बाग, ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार सतीश ढोले यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेकडे गांजा असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून आरोपी महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडून 21 हजार 850 रुपये किंमतीचा 874 ग्रम वजनाचा गांजा जप्त केला. पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.