breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

20 कोटींचे ‘मेफेड्रॉन ड्रग्ज’ पोलिसांच्या हाती, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी

पिंपरी | महाईन्यूज

काळ्या बाजारात विक्री होणारे तब्बल 20 कोटी रुपयांचे मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेल्या पाचजणांच्या टोळीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई चाकण-शिक्रापूर रोडवर शेल पिंपळगाव येथे बुधवारी (दि. 7) केली.

चेतन फक्कड दंडवते (वय 28, रा. मलठण-आंब्रेवस्ती, ता. शिरुर) आनंदगीर मधुगिर गोसावी (वय 25, रा. जि. जळगाव. सध्या रा. अकोले, शिरुर), अक्षय शिवाजी काळे (वय 25, रा. पाचर्णे मळा, ता. शिरुर), संजिवकुमार बन्सी राऊत (वय 44, रा.झारखंड, सध्या रा. उत्तरप्रदेश), तौसिफ हसन मोहम्मद तस्लीम (वय 31, रा. मुजफ्फरनगर. सध्या रा. नोएडा) अशा पाचजणांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांना माहिती मिळाली की, चाकण शिक्रापूर रोडने निळ्या रंगाची फॉक्सवेगन पोलो कार (एम एच 12 / एम एल 4716) जात आहे. तिच्यामध्ये अंमली पदार्थ असल्याचे समजले. त्यावर अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलिसांनी चाकण-शिक्रापूर रोडवर शेल पिंपळगाव, मोहीतेवाडी, धावरदरा परिसरात सापळा लावला. पोलिसांनी आरोपीच्या कारचा पाठलाग करून एका हॉटेलसमोर गाठले. कारमध्ये पाचजण होते. त्यातील चेतन कार चालवत होता. त्याच्या बाजूला आनंदगीर बसला होता. तर अन्य तिघे मागच्या बाजूला बसले होते.

चेतनकडे असलेल्या पिशवीत आणि अक्षय, संजीवकुमार, तौसीफ यांच्याकडे असलेल्या ट्रॅव्हलींग बॅगमध्ये तब्बल 20 किलो मेफेड्रॉन (एम डी) ड्रग्ज आढळून आले. या ड्रग्जची किंमत 20 कोटी रुपये एवढी आहे. पोलिसांनी 20 कोटी रुपयांचे मेफेड्रॉन (एम डी) ड्रग्ज, 5 लाख रुपयांची कार आणि 23 हजार 100 रुपये रोख रक्कम आरोपींकडून हस्तगत केली. आरोपींच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात एनडीपीएस अ‍ॅक्ट कलम 8 (क), 21 (क), 22 (क), 29 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले, सहाय्यक पोलीस फौजदार शाकीर जिनेडी, राजन महाडिक, पोलीस कर्मचारी प्रदीप शेलार, राजेंद्र बांबळे, शकूर तांबोळी, दिनकर भुजबळ, संदीप पाटील, संतोष दिघे, प्रसाद जंगीलवाड, संतोष भालेराव, अशोक गारगोटे, दादा धस, प्रसाद कलाटे, शैलेश मगर, अजित कुटे, पांडुरंग फुंदे, प्रदीप गुट्टे, अनिता यादव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button