पिंपरी चिंचवडमध्ये शनिवारी ओमायक्रॉनचे नवीन २ रुग्ण
![2 new patients of Omycron in Pimpri Chinchwad on Saturday](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/images-90.jpeg)
पिंपरी | पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी ओमायक्रॉनचे नवीन दोन रुग्ण आढळून आले आहेत. रैन्डम तपासणीत दोन महिला रुग्णांचा ओमायक्रॉनचा अहवाल पॉझिटिव्ह आला. एका महिलेचे वय २२ तर एका महिलेचे २३ वर्ष वय आहे. या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.आतापर्यंत परदेशातून शहरात आलेले व त्यांच्या संपर्कातील अशा १६१८ जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील १५०९ जणांचे अहवाल प्राप्त झाले. परदेशातून आलेल्यांच्या संपर्कातील २८ जण पॉझिटिव्ह आले तर १४४३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
परदेशातून आलेल्या ३८ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी १४ जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. त्यांच्या संपर्कातील २८ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ११ जणांचे ओमायक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह होते. तर, रॅन्डम तपासणीत ३ रुण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आले आहेत. तर १५ जणांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. तर, १३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.
शहरात आतापर्यंत २८ रुग्णांची नोंद
शहरात आतापर्यंत ओमायक्रॉनच्या २८ रुग्णांची नोंद झाली आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या अनुषंगाने महापालिकेतर्फे शहरातील विविध भागात तपासणी रॅन्डम तपासणी मोहीम सुरू आहे. नागरिकांनी त्यासाठी सहकार्य करावे, तसेच आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला त्याविषयीची लक्षणे दिसल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.