ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
भरदिवसा 14 लाखांची घरफोडी
पिंपरी चिंचवड | दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी 14 लाख 30 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 8) दुपारी जुनी सांगवी येथे घडली.कैलास चिधू सोनावणे (वय 61, रा. सोना अपार्टमेंट, लक्ष्मीनगर, जुनी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनावणे यांचे घर बुधवारी दुपारी सव्वादोन ते साडेतीन या कालावधीत बंद होते. त्यावेळी चोरट्यांनी त्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेली तीन लाख रुपयांची रोकड व 330 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण 14 लाख 30 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.