चोवीस तासांत 13,405 कोरोना रुग्णांची नोंद, 34,226 जणांना डिस्चार्ज
![13,405 corona patients recorded in 24 hours, 34,226 discharged](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/pjimage-2021-12-17T190412.122.jpg)
पिंपरी चिंचवड | गेल्या 24 तासांत देशभरात 13 हजार 405 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 34 हजार 226 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 1.24 टक्के एवढा झाला आहे.आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 4 कोटी 28 लाख 51 हजार 929 एवढी झाली आहे. त्यापैकी 4 कोटी 21 लाख 58 हजार 510 रूग्ण यशस्वी उपचारानंतर बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.38 टक्के एवढा झाला आहे.
देशात सध्याच्या घडीला 1 लाख 81 हजार 075 ॲक्टिव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 235 कोरोना रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. आजवर 5 लाख 12 हजार 344 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा मृत्यूदर 1.20 टक्के एवढा झाला आहे.
ICMR च्या आकडेवारी नुसार आजवर 76.12 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 10.84 नमूने तपासण्यात आले आहेत. देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आजवर 175 कोटी 83 लाख 27 हजार 441 जणांना लस टोचण्यात आली आहे.