11 किलो गांजा केला जप्त; वाकड पोलिसांची कामगिरी
![Five lakh cannabis brought for sale from town caught in Tathwade](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/11-kg-ganja-found-with-ganja-smuggler-.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – बेकायदेशीर विक्री करण्यासाठी अकरा किलो गांजा घेऊन जाणा-या तरुणाच्या वाकड पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडे रोख रक्कमेसह काळ्या बाजारातील 1 लाख 65 हजार 600 रुपये किंमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई रविवारी (दि. 9) सकाळी साडेनऊच्या सुमारास भूमकर चौक रस्त्यावर करण्यात आली.
गोपाल संजय माळी (वय 27, रा. हुडकु शिरपूर, ता. शिरपूर, जि. धुळे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाल हा 11 किलो 42 ग्रॅम गांजा बेकायदेशीरपणे विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी शिताफिने सुत्रे हलवून भूमकर चौक परिसरात डेअरी फार्म गेट नंबर 2 च्या समोरील बाजुवर गोपालला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता एक लाख 65 हजार 600 रुपये किंमतीचा 11 किलो गांजा आणि 400 रुपये रोख असा मुद्देमाल जप्त केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.