महाळुंगे व चाकण वाहतूक विभागाला १०० बॅरेकेट्सची भेट!
WTE कंपनीचा विधायक पुढाकार: महाळुंगे व चाकण परिसरातील वाहतूक नियंत्रण सुलभ होणार"

पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील महाळुंगे आणि चाकण वाहतूक विभागाला वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावी करण्यासाठी WTE INFRA PROJECT PVT. LTD. या कंपनीकडून एकूण १०० वाहतूक बॅरेकेट्स प्रदान करण्यात आल्या.
याप्रसंगी पोलिस प्रशासनाने सांगितले की, या बॅरेकेट्समुळे महाळुंगे व चाकण परिसरातील वाढती वाहतूक आणि औद्योगिक वसाहतींमुळे निर्माण होणाऱ्या ट्रॅफिक समस्यांवर नियंत्रण ठेवणे अधिक सुलभ होणार आहे. याशिवाय अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि वाहनचालकांमध्ये शिस्त निर्माण करणे यामध्येही मोठी मदत होईल.
हेही वाचा : पदे दिल्याचे भान विसरलेल्यांना घरी बसवा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

WTE INFRA PROJECT PVT. LTD. ने सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमाद्वारे पोलिस प्रशासनाला सहकार्य केले असून, पोलीस आयुक्तालयाने त्यांचे आभार मानले. भविष्यातही अशा प्रकारच्या उपक्रमांतून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले.
वाहतूक बॅरेकेट्सच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्थापन अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुलभ होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले आहे.




