breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

हॉटेल, बार, रेस्टॉरंट चालविताना मार्गदर्शक सूचनांचे पालन करा : जिल्हाधिकारी

पुणे । प्रतिनिधी

हॉटेल, बार, रेस्टॉरंट चालविताना मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

शासनाच्या आदेशान्वये ५० टक्के क्षमतेनुसार हॉटेल्स, फुड कोर्ट, रेस्टाँरट व बार हे ५ ऑक्टोबर पासून सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्या अनुषंगाने जिल्हयात हॉटेल, रेस्टॉरंट या आस्थापना चालू करण्यास दिनांक ५ ऑक्टोबर २०२० रोजी आदेश निर्गमित केलेले आहेत. महाराष्ट्र शासन व पर्यटन विभाग यांनी ज्या सूचना निर्गमित केलेल्या आहेत त्या सूचनेनुसार विशेषत: हॉटेल, बार, रेस्टॉरंट यांच्याकडून या आदेशाची योग्य रितीने अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांनी साथ नियंत्रण कायदा, १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ मधील तरतुदींनुसार प्राप्त असलेल्या अधिकारान्वये पुढील प्रमाणे विहित मानक कार्यप्रणाली निर्गमित केली आहे.

पुणे जिल्हयातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील हॉटेल्स, फुड कोर्ट, रेस्टॉरंट व बार हे ५ ऑक्टोबर २०२० पासून ५० टक्के क्षमतेनुसार सूरु राहतील. या करीता पर्यंटन विभागाकडून निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना (एसओपी) चे पालन करणे बंधनकारक आहे. पुणे जिल्हयातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील हॉटेल्स, फुड कोर्ट, रेस्टॉरंट व बार हे दि. ५ ऑक्टोबर पासून ५० टक्के क्षमतेनूसार सूरु राहतील. हॉटेलमध्ये येणा-या सर्व ग्राहकांची प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्कॅनिंग द्वारे तपासणी करण्यात यावी. तसेच आरोग्य सेतू ॲप, डाऊनलोड व अपडेटेड असणे आवश्यक आहे. कोविड-19 संदर्भात लक्षणे नसलेल्या ग्राहकांनाच हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात यावा. ताप, सर्दी, खोकला या सारखी लक्षणे असलेल्या ग्राहकांना हॉटेलमध्ये प्रवेश देऊ नये. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या अनुषंगाने प्रत्येक ग्राहक, ग्रूप मधील एकाचे नांव, संपर्क क्रमांक ई-मेल आयडी, दिनांक, वेळ इ. माहितीच्या नोंदी दररोज अद्ययावत ठेवण्यात याव्यात. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या अनुषंगाने ग्राहकांची माहिती आरोग्य विभाग किंवा प्रशासनास देण्याबाबत त्यांची ना हरकत घेण्यात यावी. आस्थापनांनी सेवा देताना किंवा प्रतिक्षालय येथे सोशल डिस्टन्सिंगचे नियमांचे पालन करावे. ग्राहकांनी मास्क परिधान केले असेल तरच त्यांना हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात यावा. ग्राहकांनी हॉटेलमध्ये व हॉटेलच्या परिसरात असताना मास्क परिधान करणे बंधनकारक आहे. (खानपाना व्यतिरिक्त) आस्थापना चालकांनी ग्राहकांसाठी हॅण्ड सॅनिटायझर प्रतिक्षा कक्ष, प्रवेशव्दार इत्यादी ठिकाणी उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे. आस्थापना चालकांनी ग्राहकांना शक्यतो डिजीटल माध्यमाद्वारे पेमेंट करण्यास प्रोत्साहन द्यावे. रोख स्वरुपात पेमेंट घेताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कॅशियर यांनी त्यांचे हात सतत निर्जंतूक करावेत. रेस्टरुम व हात धुण्याच्या जागा यांची वारंवार स्वच्छता करण्यात यावी व वारंवार वापर होणाऱ्या जागा निर्जंतुकीकरण कराव्यात. काऊंटर कॅशिंयर आणि ग्राहकांमध्ये शक्यतो प्लकसिग्लास स्क्रीन या सारखे बॅरीयर असावे. शक्यतो प्रवेशासाठी व बाहेर जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग ठेवावेत. शक्यतो दारे, खिडक्या उघडी ठेवावीत व ए.सी.चा वापर टाळावा. ए.सी. वापरणे अनिवार्य असल्यास त्या यंत्रणेचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे. शक्य असल्यास पोर्टेबल हाय एफिसियन्सी एयर क्लीनर बसवावेत. आस्थापनेच्या संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असावी. सीसीटीव्ही रेकॉर्ड जतन करण्यात यावे. आस्थापनेच्या ठिकाणी व्हॅलेट पार्किंग उपलब्ध असल्यास त्या ठिकाणी काम करणा-या कर्मचा-यांनी मास्क, ग्लोव्हज यांचा वापर करणे अनिवार्य आहे. डिस्पोजेबल मेनू कार्ड, क्युआर कोड सारख्या माध्यमातून संपर्करहित मेनूकार्ड उपलब्ध करण्यात यावे. रीयुजेबल मेनू कार्ड ग्राहकांचे वापरानंतर निर्जंतुक करावे. डिस्पोजेबल मेनू कार्ड वापरानंतर त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी. कापडी नॅपकीन ऐवजी चांगल्या प्रतीच्या डिस्पोजेबल पेपर नॅपकीनचा वापर करावा. आस्थापनांनी दोन टेबल मधील अंतर कमीत कमी 1 मीटर असेल या प्रमाणे त्यांचे रचनेमध्ये योग्य ते बदल करुन घ्यावेत. ग्राहकांच्या मागणीनुसार बाहय बाजू निर्जंतूक केलेली सीलबंद बाटलीतील पाणी अथवा फिल्टर केलेले पाणी ग्राहकांना उपलब्ध करुन दयावे. मेनु मध्ये फक्त शिजवविलेल्या खाद्य पदार्थांचा समावेश करावा शक्य असल्यास सलाड सारखे कच्चे पदार्थ, थंड पदार्थ टाळावेत. प्रत्येक ग्राहकांच्या वापरानंतर ग्राहक सर्विस एरियाचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. फर्निचर, टेबल, खुर्च्या, बुफे, टेबल काऊंटर इ. जागांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे. बुफे सेवेला परवानगी नाही.

मेनु मध्ये प्री प्लेटेड डिशेशना प्रोत्साहन द्यावे. हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंटस आणि बार आस्थापना यांना एकुण क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेसह सुरु ठेवण्यासाठी परवानगी असेल. त्यासाठी पर्यटन विभागामार्फत स्वतंत्र मार्गदर्शक कार्यप्रणाली निर्गमित करण्यात आली आहे. मार्गदर्शक कार्यप्रणाली नुसार कामकाज चालु ठेवणे बंधनकारक राहिल. पुणे जिल्हयातील सर्व व्यक्तींना अत्यावश्यक कारणा व्यतिरिक्त इतर कामकाजासाठी घराबाहेर पडताना मुखपटटी वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे व वैयक्तिक स्वच्छते विषयीचे सर्व नियम पाळणे बंधनकारक असल्याने प्रतिबंधीत क्षेत्र (कंटेनमेंट झोन) विषयक संबंधीत प्राधिकरणाने वेळोवेळी निर्गत केलेल्या आदेशातील सर्व सुचनांचे पालन करणे बंधनकारक राहिल. सर्व आस्थापना प्रमुखांनी त्यांचे अधिनस्त कार्यरत कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या भ्रमणध्वनीमध्ये आरोग्य सेतू प डाऊनलोड केल्याची खात्री करुन घ्यावी. परवाना कक्षामध्ये सोशल डिस्टसिंग राहिल, अशी बैठक व्यवस्था करावी तसेच परवाना कक्षाममध्ये बार काऊंटर, टेबल खुर्च्या, विविध उपकरणे उदा. शेकर्स, ब्लेंडर, मिक्सर आणि मदयाचे आकारमान मोजण्यासाठी पेग व अन्य साहित्य सातत्याने सॅनिटाईज करण्यात याव

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button