breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हिंदु-हदयसम्राट चषक हाफपीच क्रिकेट स्पर्धेत ‘वीर जवान’ची बाजी

 

– दादा नरळे स्पोर्ट्स क्लब ठरला द्वितीय क्रमांकाचा विजेता संघ

– स्व. बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त रुपीनगरात स्पर्धा संपन्न

पिंपरी / महाईन्यूज

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रुपीनगर शाखेच्या वतीने तीन दिवसीय “हिंदु-हदयसम्राट चषक हाफपीच क्रिकेट स्पर्धा” घेण्यात आल्या. वीर जवान स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडुंनी अंतिम सामन्यात उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघावर मात केली. या संघाने स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकवले. तर, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक दादा नरळे स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी जिंकले.

शिवसेना संपर्कप्रमुख उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली रुपीनगर विभागप्रमुख नितीन बोंडे यांच्या नेतृत्वाखाली कृष्णानगर येथील सिमेंट मैदानावर 23, 24 आणि 25 जानेवारी दरम्यान स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचे उदघाटन सहसंपर्क प्रमुख इरफान सय्यद, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, चिंचवड विधानसभा संघटक संतोष सौंदणकर, नम्रता इलेक्टरीकल्सचे मालक नरसिंग, काका बराटे, सर्जेराव आबा भोसले, सचिन सानप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुजित तांबोळी, गणेश सूर्यवंशी, दयानंद भालेकर, गोरख कदम सर, सर्जेराव कचरे, पांडुरंग कदम, नामदेव नरळे, दादा नरळे, सहदेव चव्हाण, रमेश पाटोळे, सुजित साळवी, साहेबराव काळे, बाळासाहेब सारंगधर, दिनकर जाधव, दत्तात्रय ढोले, संतोष पवार, पवार काका, मोहन जाधव, प्रविण जाधव, परेश मोरे, सतिश कंठाळे, अभिषेक काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या स्पर्धेत वीर जवान स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जिंकले. त्यांना राहूल सर्जेराव भोसले यांच्या वतीने 9 हजार 999 रुपये रोख आणि चषक देण्यात आला. दादा नरळे स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडुंनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जिंकले. या क्लबच्या खेळाडुंना 7 हजार 777 रोख रक्कम आणि चषक प्रदान करण्यात आला. आशा भालेकर यांनी स्पर्धेतील द्वितीय संघासाठी हे बक्षिस ठेवले होते. व्ही. आर. स्पोर्ट्स क्लबने तृतीय क्रमांक पटकवल्याने त्यांना 5 हजार 555 रोख रक्कम आणि चषक देण्यात आला. सुजित तांबोळी यांच्या वतीने हे बक्षिस ठेवले होते. दत्ता काका साने स्पोर्ट्स क्लबने चतुर्थ क्रमांकाचा चषक जिंकला. त्यांना देखील अनिल सोमवंशी यांच्या वतीने 3 हजार 333 रुपये रोख व चषक प्रदान करण्यात आला.

पहिल्या चार संघांना भव्य चषक सचिन सानप यांच्या वतीने देण्यात आला. सुनिल पवार यांच्या वतीने मॅन ऑफ द सिरीज 2 हजार 1 रुपये रोख बक्षिसासह दिला. बापूसाहेब घोडके यांच्या वतीने 1 हजार 501 रोख बक्षिस उत्कृष्ट फलंदाज करणा-या खेळाडूला देण्यात आले. तर, सुधीर मोहन मिरगणे यांच्या वतीने 1 हजार 501 रुपयांचे बक्षिस उत्कृष्ट गोलंदाजी करणा-या खेळाडुला प्रदान करण्यात आले. स्पर्धेत 64 संघांना प्राधान्य देण्यात आले होते. तसेच, आपल्या गोलंदाजीच्या जोरावर बेस्ट बॉलरचा बहुमान गणेश सूर्यवंशी यांने पटकवला. तर, अझरने बेस्ट बॅट्समनचा किताब मारला. सर्वच खेळाडूंनी उत्कृष्ट प्रकारे खेळ खेळल्याने या स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या. स्पर्धेतील सर्व विजयी संघप्रमुखांना आणि खेळाडूंना ज्येष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला.

या स्पर्धा घेण्यासाठी विभागप्रमुख नितीन बोंडे, शाखाप्रमुख प्रविण पाटील, युवा सरचिटणीस अमित शिंदे, उपविधान अधिकारी सुनिल समगीर, सौरभ मोरे, उपविभागप्रमुख अभिजित गिरी, गणेश सूर्यवंशी यांनी मोलाचा वाटा उचलला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button