Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हिंजवडीत ‘आयटी’ कर्मचा-याने घेतला गळफास, नातेवाईकांना खुनाचा संशय

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

हिंजवडी आयटी पार्कमधील टीसीएस कंपनीत एका फोन रिसेप्शनिस्टने ऑफिसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्तेचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कपिल गणपत विटकर (वय ३९) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिल यांनी टीसीएस कंपनीत सहाव्या मजल्यावर जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कपिल यांच्या गळ्याभोवती प्लास्टिक लॉक टॅग होता. त्यांचे ऑफिस तिसऱ्या मजल्यावर आहे. मात्र, त्यांनी सहाव्या मजल्यावर जाऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेचा अधिक तपास गुन्हे पोलीस निरीक्षक अजय जोगदंड हे करत आहेत.

आज पहाटे सहाच्या सुमारास कपिल विटकर हे कंपनीत कामाला आले होते. त्यांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून झाला असल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे व्यक्त केला आहे, अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे. तिसऱ्या मजल्यावर त्यांचं ऑफिस आहे. मात्र, सीसीटीव्ही नाही अशा सहाव्या मजल्यावर संबंधित घटना घडली आहे. त्यामुळे हा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला असल्याचं पोलिसांनी सांगितले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button