breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्वाईन फ्लूने शहरात एकाचा बळी, आतापर्यंत 33 जणांचा मृत्यू

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूने थैमान घातले आहे.  शहरात ‘स्वाईन फ्लू’ ने एका ५३ वर्षीय पुरूषाचा बुधवार (दि.17) मृत्यू झाला आहे. वायसीएम रूग्णालयात उपचारादरम्यान या रूग्णाचा मृत्यू झाला असून दहा महिन्यात हा ३३ वा बळी ठरला आहे. 

महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार ‘स्वाईन फ्लू’ने पिंपरीतील ५३ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. या रूग्णाला ९ ऑक्टोबर रोजी वायसीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू त्याची प्रकृती खालावत गेल्याने १४ ऑक्टोबर रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

दरम्यान शहरातील विविध रूग्णालयात ११ बाधित रुग्णांवर उपचार सुरू अाहेत. तर थेरगाव येथील खाजगी रूग्णालयात ७ रूग्णांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या आजाराने मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढत असून जानेवारीपासून अाजपर्यंत ३३ रुग्ण दगावले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button