स्वाईन फ्लूने आज आणखी एका महिलेचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/swine-flu-h1n11-e1424415900379.jpg)
पिंपरी (महा ई न्यूज) – शहरामध्ये स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. आज आणखी एका महिलेचा मृत्यू झाल्याचे पालिकेच्या वैद्यकीय विभागाने जाहीर केले. पिंपरी-चिंचवड शहरात जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत स्वाईन फ्लूने तब्बल 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज बुधवारी (दि. 26) 3 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. सध्या शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 26 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
चाकण मधील या महिलेला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. स्वाईन फ्ल्यूचा त्रास वाढल्याने त्यांना कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले. मंगळवारी (दि. 25) रोजी उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 170 जणांना स्वाईन फ्लू झाला असून आजअखेर 24 जण दगावले आहेत.
स्वाईन फ्लूची लक्षणे आढळताच तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात भरती करावे, तसेच डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्यावा. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यायला हवी, असे आवाहन वैद्यकीय विभागाकडून करण्यात येत आहे.