breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘स्मार्ट सिटी’ असलेल्या पिंपळे साैदागर, पिंपळे गुरवमध्ये कच-यांचे ढिग

  • आयुक्तांना अल्टीमेटम्, सोमवारपर्यंत कच-यांचा प्रश्न मार्गी लावा
  • आरोग्य कार्यकारी अधिकारी, सहा.आरोग्य अधिका-यांचे निलबंन करा

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत आहे. स्मार्ट सिटीची कामे हाती घेतलेल्या पिंपळे गुरव, पिंपळे साैदागरमध्ये मागील आठ दिवसापासून कच-यांचे ढिग साचले आहेत. सध्यस्थितीत पावसाळा सुरु असल्याने नागरिकांच्या आरोग्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या सोमवारपर्यंत आयुक्तांनी कच-यांचा प्रश्न मार्गी न लावल्यास मुख्य आरोग्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य कार्यकारी अधिकारी, सहायक आरोग्य अधिका-यांना तात्काळ निलंबनाची कारवाई करा, असा इशारा उपमहापाैर सचिन चिंचवडे यांनी आयुक्त श्रावण हर्डिकर यांना दिला.

पिंपरी चिंचवड महापालिकेतील उपमहापाैरांच्या दालनात शहरातील कच-यांच्या प्रश्नावर आज (शुक्रवारी) बैठक पार पडली. यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, मोरेश्वर शेडगे, मोरेश्वर दुर्ग, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, मुख्य आरोग्य कार्यकारी अधिकारी डाॅ. अनिल राॅय, प्रभारी आरोग्य कार्यकारी अधिकारी डाॅ. लक्ष्मण गोफणे तसेच क्षेत्रीय कार्यालयातील सर्व सहायक आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

घरोघरचा कचरा संकलन करुन तो मोशीच्या कचरा डेपोपर्यंत घेवून जाणार आहे. शहरातील कचरा संकलन आणि वाहून नेण्याचे उत्तर भागाचे काम बी.व्ही.जी इंडिया लिमिटेड यांना 21 कोटी 56 लाख आणि दक्षिण भागाचे काम ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स 22 कोटी 12 लाख रुपयांमध्ये देण्यात आले आहे.  28 फेब्रुवारी रोजी महापालिकेने दोन्ही कंत्राटदारांना कामाची वर्कऑर्डर दिली होती. तथापि, वाहने उपलब्ध झाली नसल्याने काम सुरु केले नव्हते. वाहने उपलब्ध झाल्यानंतर 1 जूलैपासून संपूर्ण नवीन वाहनांसह शहरातील कचरा संकलन आणि वहनाचे काम सुरु झाले आहे.

गेल्या पाच दिवसापासून शहरात कच-याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील कचरा उचलण्यास मनुष्यबळ आणि गाड्याची ठेकेदारांकडे कमतरता आहे. दोन्ही ठेकेदारांनी अपु-या साधन सामुग्रीत कामे सुरु केल्याने शहराचे ढिग जागोजागी पडले आहेत. सध्यस्थिती पावसाळा असल्याने कच-यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता आहे. याबाबत आयुक्त श्रावण हर्डिकर यांना विरोधी व सत्ताधारी नगरसेवकांनी  आंदोलन करुन कच-याचा प्रश्न सोडवण्यास सांगितले. त्यावेळी दोन्ही ठेकेदारांना नोटीस बजावण्यात आल्या. तसेच दोन दिवसात कचरा उचलण्याची तंबी दिली. तरीही कच-याचा ढिग जैसे थे आहेत.

याबाबत उपमहापाैर सचिन चिंचवडे, नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी आरोग्य कार्यकारी अधिका-यांना बोलावून तंबी दिली. मुळात डाॅक्टरांना आरोग्य विभागाचा पदभार दिल्याने कचरा प्रश्न गंभीर बनला आहे. येत्या सोमवारपर्यंत शहरातील कचरा न उचलल्यास सर्व आरोग्य अधिका-यांवर निलंबनाची कारवाई करा, ्अशी मागणी त्यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button