breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्मार्ट सिटीच्या सायकल सुविधाचे उद्या पालकमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात स्मार्ट सिटी लिमिटेडतर्फे एरिया बेस डेव्हलपमेंट प्रकल्प राबविण्यात येत आहे.  त्यानूसार सार्वजनिक सायकल सुविधा प्रकल्पाचे उद्या (रविवार)  सकाळी ११ वाजता कुंजीर क्रीडांगण कुणाल आयकॉन रोड पिंपळे सौदागर आणि सकाळी ११.३० वाजता राजमाता जिजाऊ उद्यान पिंपळे गुरव येथे होणार आहे. अशी माहिती महापालिका आयुक्त व स्मार्ट सिटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली.

या प्रकल्पाचे उद्घाटन अन्न व नागरी पुरवठा तथा पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहूणे म्हणून आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे व खासदार अमर साबळे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, सुप्रिया सुळे व आमदार ॲड गौतम चाबुकस्वार उपस्थित राहणार आहेत. महापौर राहूल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला उपमहापौर सचिन चिंचवडे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड,सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने आदी उपस्थित राहणार आहेत.

सायकल शेअरींगचा हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येत आहे. त्यानंतर पिंपळे सौदागरच्या १९ ठिकाणी , पिंपळे गुरव १५ ठिकाणी राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात सुरू होणा-या उपक्रमात सहाशे सायकली ठेवण्यात येणार आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, तसेच या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा स्मार्ट सिटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button