breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
स्थायीच्या सभापती पदासाठी विलास मडिगेरी, मयूर कलाटे आणि शितल शिंदे यांचे अर्ज दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/IMG-20190302-WA0006.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपकडून विलास मडिगेरी, राष्ट्रवादीकडून मयूर कलाटे आणि बंडखोर गटाकडून विजय उर्फ शितल शिंदे याचे उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला. त्यामुळे स्थायीच्या सभापती पदासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी अर्ज भरण्याची मुदत आहे. भाजपर्फे विलास मडिगेरी, बंडखोर गटाकडून विजय उर्फ शितल शिंदे आणि राष्ट्रवादीकडून मयूर कलाटे या चारजणांचे अर्ज भरले आहेत.