स्थानिक कामगारांना नोकरीसाठी प्राधान्य द्या
– युवासेनेची डीटीडीसी कंपनीला निवेदनाद्वारे मागणी
पिंपरी । प्रतिनिधी
कंपनीमध्ये स्थानिक तरुणांना प्राधान्य द्या अशी मागणी युवा सेनेच्या वतीने डीटीडीसी कुरियर कंपनीकडे केली आहे. या बाबत कंपनी प्रशासनाला नुकतेच निवेदन देण्यात आले आहे.
या वेळी युवा सेनेचे ऍड. कुणाल किसन महाराज तापकीर, शिवसेना भोसरी विधानसभेचे प्रमुख धनंजय आल्हाट, निलेश मुटके, संतोष वाळके,
निवेदनात नमुद केले आहे की, अनेक स्थानिक तरुण नोकरीसाठी दिघी येथील डीटीडीसी कंपणीकडे अर्ज करतात. मात्र त्यांना नोकरी दिली जात नाही. त्याबाबत अनेक तरुणांच्या तक्रारी मिळाल्या आहेत. त्यानुसार आपण स्थानिक तरुणांना नोकरीसाठी प्राधान्य द्यावे अशी, मागणी युवासेनेकडून करण्यात आली. स्थानिकांना ७० टक्के तर इतरांना ३० टक्के प्राधान्य द्यावे, अशी मागणी या वेळी कुणाल तापकीर व पदाधिकाऱ्यानी कंपनी व्यवस्थापनाकडे केली.